जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धा
देवरूख (सुरेश सप्रे) : 19 जुलै बँक राष्ट्रीयकरण 55 वा वर्धापन दिन. याचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आर्थिक साक्षरता अभियानाचा एक भाग म्हणून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्यातील एक उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धा आहे. यासाठी महिला बचत गटाकडून विहित नमुन्यात माहिती दिनांक 20 जुलैपर्यंत मागविण्यात येत आहे.
संघटनेतर्फे एका तज्ञ समितीचे गठन करण्यात आले आहे. ही समिती आर्थिक साक्षरताच्या विविध निकषांवर या बचत गटांचे मूल्यांकन करून तीन उत्कृष्ट महिला बचत गटांना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष समारंभात पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय संघटनेच्या वतीने आर्थिक साक्षरता प्रदर्शनाचे शहरातील विविध भागात आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील जे महिला बचत गट सहभागी होऊ इच्छितात त्यानी श्री. विनोद काशिनाथ कदम बँक ऑफ इंडिया देवरुख शाखा. मोबाईल 9422595558 यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यात आपल्या बचत गटाची माहिती रत्नागिरी जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समिती, बँक ऑफ इंडिया शाखा देवरुख या पत्यावर पाठवावी असे आवाहन श्री विनोद कदम संयोजक रत्नागिरी जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने करण्यात येत आहे.