लांजातील तळवडे येथे १४ ऑगस्टला राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा
लांजा : लांजा तालुक्यातील तळवडे येथे १४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. संस्कार प्रतिष्ठान पूर्व विभाग यांच्या वतीने या स्पर्धा आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील आणि जिल्हातील नामवंत बैल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. घाटी जोडी आणि गावठी जोडी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मानाची ढालीचाही समावेश आहे. मंडळाचे मुन्ना पाटोळे 8975643665, गौरव पाटोळे 9403605066 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तळवडे विठ्ठल मंदिर शेजारी ही स्पर्धा ठिकाण आहे. प्रवेश फी 500 आणि 300 रुपये आहे.
या स्पर्धेदरम्यान ‘मेरा देश मेरी मिट्टी’ अभियान अंतर्गत मंडळाच्या वतीने हुतात्मा वीर कुटुंबाचा, माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष उदय गोपीनाथ पाटोळे, सचिव प्रकाश पाटोळे यांनी जास्तीत जास्त शेतकरी यांनी या चिखल नांगरणी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे