कोकण रेल्वे मार्गावर १ डिसेंबरला रेल्वेचा अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्याचे सत्र सुरूच आहे. दिनांक एक डिसेंबर 2023 रोजी रत्नागिरी ते वैभववाडी स्थानकादरम्यान अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दि. 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत असा अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
१) तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस (16343) नेत्रावती एक्सप्रेस जिचा प्रवास 30 नोव्हेंबरला सुरू होईल ती एक्सप्रेस गाडी कर्नाटकातील उडुपी ते सिंधुदुर्गातील कणकवली स्थानकादरम्यान दोन तास तीस मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
२) सावंतवाडी रोड ते दिवा एक्सप्रेस (10106) ही दिनांक १ डिसेंबर रोजीची गाडी सावंतवाडी ते कणकवली दरम्यान तीस मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे
३) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी (12051) ही दिनांक 1 डिसेंबर रोजी 2023 रोजीची गाडी मेगाब्लॉकमुळे रत्नागिरी स्थानकावर दहा मिनिटांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे.