शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा 2023-24 डी. बी. जे महाविद्यालय चिपळूण येथे जिल्हा संघटनेच्या सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात संपन्न झाल्या.
ह्या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून बहुसंख्य शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उदघाट्न डी. बी. जे महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर सर, चिपळूण तालुका किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अविदादा केळस्कर, डी. बी. जे महाविद्यालयचे रजिस्टार अनिल कलकुटकी, चिपळूण तालुका शारीरिक संघटनेचे अध्यक्ष राकेश खांडेकर सर, क्रीडाशिक्षक बबन आघाव सर, सुशांत पाटील सर, दीपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा संपन्नतेसाठी चेतन घाणेकर, विनोद राऊत, हुजैफा ठाकूर, मंदार साळवी, प्रणित सावंत, स्वप्नाली पवार, गुफरान खान, गणेश राठोड, स्वानंद खेडेकर, मल्हार रजपूत, समरान घारे, रेहान घारे आदींनी पंच म्हणून काम पहिले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक येणारे खेळाडू विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हाचे नेतृत्व करतील.