महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
विकसित भारत संकल्प यात्रेत
विकसित भारत संकल्प यात्रेत
मौजे गुडघे, मौजे ओणनवसेतील शेतकऱ्यांना माहिती
रत्नागिरी, दि. १३ : दापोली तालुक्यातील मौजे गुडघे आणि मौजे ओननवसे येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कृषी विषयक केंद्र व राज्य पुरस्कृत शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली.
यामध्ये फळपिक विमा, प्रधानमंत्री फसल विमा योजना, मग्रारोहयो फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, शेतकरी अपघात विमा योजना, यांत्रिकीकरण अशा अनेक योजनांची माहिती दिली.
यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इतर विभागातील अधिकारी कर्मचारी आणि कृषी सहाय्यक दाभोळ शुभंकर यादव उपस्थित होते.