सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना सुरक्षा माहितीसह शालेय वस्तूचे वाटप
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सुरक्षा सप्ताह निमित्ताने उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या पीएसए अमेया कंपनी मार्फत खोपटे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक पर्यावरण स्वास्थ सुरक्षेबद्दल माहिती देऊन शालेय वापरातील किटचे वाटप करण्यात आले आहे.
पीएसए अमेया कंपनीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन दुर्बल घटकांतील नागरिकांना कपडे, उपयोगी वस्तू वाटप, आदिवासी शाळेवर शालेय उपयोगी वस्तूचे वाटप, कोविड काळात सम्पूर्ण परिसरात सॅनिटायझरिंग करणे, आरोग्य सेवा पुरवणे असे विविध कार्य केले आहे. सुरक्षा सप्ताह निमित्ताने खोपटे शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षेविषयी माहिती आणि त्यांना शालेय उपयोगी किटचे वाटप करण्यात आले आणि त्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
या कार्यक्रम प्रसंगी पीएसए अमेया व्यवस्थापनाचे एडमिन डिपार्टमेंट मुख्यव्यवस्थापक राकेश नायर , पुष्पम कदम, जान्हवी म्हात्रे, एचएसइ डिपार्टमेंटचे परमिंदर सिंग, साहिल नाखवा, बांधपाडा ग्रामपंचायतचे सरपंच विशाखा ठाकूर, गाव व्यवस्थापनाचे अध्यक्ष कृष्णा ठाकूर, शिक्षणप्रेमी अजित ठाकूर, शिक्षण प्रेमी हेमंत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. २६ जानेवारीला गणतंत्र दिवसाचे औचित्य साधून शाळेला वृक्ष लागवडीसाठी पीएसए अमेया कडून वृक्ष देण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थ मंडळ खोपटे, यांच्या कडून पीएसए अमेया कंपनीच्या कार्याचे विशेष कौतुक केले जात आहे.