ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूज
Mumbai-Goa Highway | रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण व्हावे
रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई,गोवा महामार्गाचे (NH 66) उर्वरित काम अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवापर्यंत पूर्ण व्हावे तसेच गोव्यातील पेडणेमधील पत्रादेवी ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पर्यंत पूर्ण झालेल्या भागाचे सुशोभीकरण पूर्ण व्हावे ही मागणी देखील नारायण राणे यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.