Mumbai-Goa Highway | रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण व्हावे

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कामासंदर्भात गुरुवारी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना खासदार नारायण राणे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई,गोवा महामार्गाचे (NH 66) उर्वरित  काम अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवापर्यंत पूर्ण व्हावे तसेच गोव्यातील पेडणेमधील पत्रादेवी ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पर्यंत पूर्ण झालेल्या भागाचे  सुशोभीकरण पूर्ण व्हावे ही मागणी देखील नारायण राणे यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment