उद्योग जगत

अल्पसंख्याक उमेदवारांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

गरजू उमेदवारांनी प्रवेशासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्यांशी संपर्क साधावा

 

अलिबाग : शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत मुंबई विभागामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर 67 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. शासनातर्फे अल्पसंख्याक लोकसमूहातील युवक व महिला यांना अल्पमुदतीचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणास प्रवेश उपलब्ध आहेत.


या अंतर्गत मुंबई विभागातील एकूण 36 औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे, असे सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांनी कळविले आहे.

विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था

मुंबई शहर जिल्हा-मांडवी, दादर (मुलींची) लोअर परेल, मुंबई-11, मुंबई उपनगर जिल्हा-कुर्ला, नेहरूनगर कुर्ला (चांदीवली), बोरीवली, मुलुंड, ठाणे जिल्हा- शहापूर, ठाणे (मुलींची), अंबरनाथ, बेलापूर, भिवंडी, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, पालघर जिल्हा-जव्हार, वाणगाव, रायगड जिल्हा- महाड, माणगाव, पनवेल, पोलादपूर. रत्नागिरी जिल्हा-चिपळूण, दापोली, गुहागर, लांजा, मंडणगड, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, सिंधूदुर्ग जिल्हा- देवगड दोडामार्ग, मालवण, फोंडाघाट, सावंतवाडी, वेंगुर्ला.
अल्पसंख्याक लोकसमूहातील (मुस्लिम,जैन,ख्रिश्चन,नवबौद्ध,पारसी,शिख) युवक व महिलांकरिता औद्योगिक आस्थापनांना आवश्यक कुशल मनुष्यबळाच्या मागणीनुसार संबंधित अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण निःशुल्क देण्यात येणार आहे.


या अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रमानुसार इयत्ता 5 वी ते 12 वी उत्तीर्ण अशी आहे.
तरी गरजू उमेदवारांनी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्यांशी प्रवेशासाठी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबई यांनी केले आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button