उद्योग जगत

एका उद्योजिकेच्या हस्ते इतर उद्योजिका महिलांचा सन्मान

महिला दिन विशेष !

उरण  (विठ्ठल ममताबादे )  :  “एक महिला उद्योजक बनली तर तिच्यामुळे इतर महिला देखील उद्योजिका होतात” या उक्तीप्रमाणे उरण मधील उद्योजिका पूनम पाटेकर यांनी ऑरगॅनिक  सॅनिटरी नॅपकिन्स चा तीन वर्षापूर्वी व्यवसाय चालू केला. पण हा एक व्यवसाय म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्य म्हणून त्यांनी हा वसा  उचलला आणि मोफत डेमो च्या माध्यमातून घराघरात, शाळा, सोसायटी, बचत गट,महिलांचे आयोजित कार्यक्रमांमधून मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केली आणि काही महिलांनी देखील या कार्यात खारीचा वाटा उचलला आणि हा व्यवसाय करण्यास इच्छा दर्शवली आणि जोरदार पणे आपापल्या परीने व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कामाचे कौतुक आणि सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोखरण गल्ली, म्हातवली, उरण येथे सन्मान सोहळा पार पडला. पूनम पाटेकर यांनी तुळशीचे रोप देऊन उद्योजिका असलेल्या महिलांचा सन्मान केला.आणि त्यांना व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारती कडू-द्वारका नगर म्हातवली,  हर्षा गावंड-काठे आळी,  वैशाली म्हात्रे- म्हातवली, हर्षा वारीक-वारीक आळी, श्रावणी आपनकर- उरण,  दीपिका पाटील-खोपटा उरण, जुईली म्हात्रे, अमृता गावंड- उरण , हेमा घरत- निसर्ग उपचार केंद्र उरण या सर्व महिला उपस्थित होत्या. हे कार्य असेच अविरत पणे चालू राहील आणि जास्तीत जास्त महिला आणि मुलींना याबद्दल मार्गदर्शन करत राहू आणि महिलांना व्यवसायात देखील मार्गदर्शन करेन, असे पूनम पाटेकर यांनी यावेळी सांगितले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button