Adsense
महाराष्ट्रसाहित्य-कला-संस्कृती

चित्ररथयुक्त शोभायात्रेने रत्नागिरीत हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत!

रत्नागिरी : विविध संस्था संघटना तसेच देवस्थानांच्या चित्ररथांनी युक्त शोभायात्रा काढून बुधवारी सकाळी गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाचे रत्नागिरीत अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. सामाजिक संदेश देणाऱ्या विविध चित्ररथांनी यावेळी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील मारुती मंदिर सर्कलमधून नववर्षाचे स्वागत करणाऱ्या शोभायात्रेला सुरुवात झाली. शहरातील रस्त्याच्या एका मार्गिकेतून ही शोभायात्रा शहराकडे नेण्यात आली. सामाजिक एकता, बंधुता, सलोखा तसेच एकजूट टिकवण्याचे संदेश देणारे विविध चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते. नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानकडून काढण्यात आलेली शोभायात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या शोभायात्रेत शेकडो महिला तसेच पुरुष हातात हिंदुत्वाचे भगवे झेंडे तसेच गुढ्या घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होते. नाणिज संस्थानच्या नववर्ष स्वागसत पथकात मांगल्य कलश डोक्यावर घेतलेल्या महिलांनी शोभायात्रेचे पावित्र्य वाढवले.

ढोल ताशांच्या गजरात मारुती मंदिर येथून सुरू झालेली ही ही नववर्ष स्वागत यात्रा रस्त्याच्या एका मार्गिकेने शिस्तबद्धपणे शहराच्या दिशेने पुढे सरकत होती. या शोभायात्रेत हजारो नागरिक भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान शिस्तबद्धता राखली जावी तसेच वाहतुकीचे नियमन व्हावे, याच्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी रत्नागिरीतील नववर्ष स्वागत यात्रा नागरिकांना ऑनलाइन कुठूनही पाहता यावी, यासाठी रत्नागिरी येथील प्रेस फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी आपल्या यूट्यूब चैनल https://www.youtube.com/live/ypLM4ixxAGY?feature=share

वर

शोभायात्रेचे लाईव्ह प्रक्षेपण केले. नागरिकांनी मालगुंडकर यांच्या या उपक्रमामुळे यावेळी प्रथमच गुढीपाडव्याला रत्नागिरीत करण्यात आलेली शोभायात्रा युट्युबवर लाईव्ह पाहता आली.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button