साहित्य-कला-संस्कृती

पैसा फंडच्या कलादालनात गुरुजनांची मांदियाळी !

निमित्त होते शालेय वार्षिक तपासणीचे

संगमेश्वर : मंगळवारपासूनच पैसा फंड शाळेच्या वार्षिक तपासणीची जोरदार पूर्वतयारी सुरु होती. अधिकारी वर्ग बुधवारी शाळा तपासणीसाठी येणार म्हणून सारेच सज्ज होते . प्रशालेत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ . सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी श्री. नरेंद्र गावंड येणार होते . या अधिकारी वर्गाच्या मदतीसाठी आजूबाजूच्या शाळांमधील मुख्याध्यापक , विविध विषयांचे शिक्षक आज सकाळी दहा वाजताच प्रशालेत दाखल झाले . पैसा फंड प्रशालेत आल्यानंतर कलादालन पाहिल्याशिवाय जायचे कसे ? या विचारात असणाऱ्या गुरुजनांनी आपले कामकाजाचे कर्तव्य संपताच थेट व्यापारी पैसा फंड संस्था , संगमेश्वरच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल मधील कला विभागाने लॉकडाऊन मध्ये उभारलेल्या कलादालनाला कधी एकदा भेट देतो असा उत्साह या गुरुजनांमध्ये होता .

कसबा हायस्कूलचे मुख्याध्यापक मणेर सर , रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष इम्तियाज शेख , कळंबस्ते हायस्कूलच्या दळी मॅडम , कडवई हायस्कूलचे आशिष सरमोकादम , बुरंबी तसेच कसबा हायस्कूलचे शिक्षक पैसा फंडचे कलादालन पाहून अक्षरशः थक्क झाले . विद्यार्थी आणि कलाकारांची कला खिळवून ठेवणारी असून हे कलादालन घाईत पहाण्याचे ठिकाण नव्हे . येथील प्रत्येक चित्र बोलके असून ते काहीतरी सांगणारे असल्याने आपण पूर्ण दिवसाचा वेळ काढून हे कलादालन पहायला येवू असे गौरवोद्गार मुख्याध्यापक मणेर यांनी काढले .

रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष इम्तियाज शेख म्हणाले की , पैसा फंडचे कलादालन विद्यार्थी , होतकरु कलाकार आणि आमच्यासारख्या कलाध्यापकांना नवी उर्जा देण्याचे काम करत असल्याने आपण संगमेश्वरकडे आल्यानंतर प्रत्येक वेळी हे कलादालन पहाण्यासाठी आवर्जून येत असल्याचे शेख यांनी नमूद केले . पैसा फंडच्या कलाविभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले .

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button