जगाच्या पाठीवरमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती

फ्रान्सचे अभ्यासक जॅकोमो बुरज्वा यांची संगमेश्वरमधील पैसा फंड कलादालनाला भेट

चित्र म्हणजे कॉपी नव्हे तर कलाकाराच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब : बुरज्वा

संगमेश्वर दि. ६ ( प्रतिनिधी ):- कलाकृती ही कॉपी करुन करता येत नाही. चित्र म्हणजे कलाकाराच्या अंतर्मनाचे ते एक प्रतिबिंब असते. आपण कलाकार नाही, मात्र कलाकृती कशी पहावी याची दृष्टी माझ्याकडे आहे. पैसा फंड कलादालनातील कलाकृती पाहून आपले मन आपोआप चिंतनात गेले. कलाकारांनी आपल्या कलाकृतीतून मांडलेल्या भावना या उत्कट आहेत म्हणूनच त्या पहाणाऱ्या व्यक्तिजवळ संवाद साधतात, असे प्रतिपादन फ्रान्सचे अभ्यासक जॅकोमो बुरज्वा यांनी केले.

फ्रान्स अभ्यासक जॅकोमो बुरज्वा हे सध्या संगमेश्वर तालुक्यात असून ते ग्रामीण जीवनाचा अभ्यास करत आहेत. एम इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स असे त्यांनी शिक्षण घेतले असून त्यांना ५ भाषा अवगत आहेत बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे धडे देवून ग्रामीण जीवनाचा अभ्यास ते करीत आहे. बुरंबी पंचकोशी शिक्षण संस्थेचे सचिव शरद बाईत आणि राजाराम गर्दे सर यांना विनंती करुन दादासाहेब सरफरे विद्यालयातील इंग्रजी शिक्षक जाधव सर यांच्यासह जॅकोमो यांना पैसा फंडचे कलादालन पहायला पाठवावे अशी विनंती कलाविभागाने केली होती. त्यानुसार आज जाधव सर हे जॅकोमो यांना घेऊन पैसा फंड कलादालन दाखविण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी जॉकोमो बुरज्वा हे बोलत होते. व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी जॅकोमो यांचे स्वागत केले आणि चित्रकार विष्णू परीट यांनी रेखाटलेली एक कलाकृती त्यांना भेट दिली.

पैसा फंडचे कलादालन पहाताना जॅकोमो यांनी प्रत्येक कलाकृती मधील वैशिष्ट्य जाणून घेतले. कलाकृतीचे माध्यम जाणून घेतले. येथील ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती या अद्वितीय आणि आश्चर्यकारक तसेच अभिनंदन आणि कौतुकास पात्र आअल्याचे जॅकोमो यांनी नमूद केले. आवडलेल्या कलाकृतींची जॅकोमो यांनी छायाचित्रे देखील घेतली. प्रशालेच्या कलाविभागातर्फे गेली २३ वर्षे विनाखंड सुरु असलेल्या ” कलासाधना ” या चित्रकला वार्षिकची देखील जॅकोमो यांनी पहाणी करुन यातील बाल कलाकारांच्या कलाकृतींची छायाचित्र घेऊन आपल्याला हा उपक्रम अत्यंत भावल्याचे सांगितले.

प्रशालेतील ९ वीच्या विद्यार्थ्यांजवळ जॅकोमो यांनी काही वेळ संवाद साधून मुलांना त्यांच्या कलाकृती सुंदर असल्याचे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, सूरज जाधव सर , कलाशिक्षक प्रदीप शिवगण, ऋतूराज जाधव, अमोल पाटील, सूरज मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

जॅकोमो यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी तर्फे शोध कलारत्नांचा या घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळेलाही भेट दिली. शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाध्ये यांनी जॅकोमो बुरज्वा यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले.

या उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून जिल्हा परिषदच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतूक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पैसा फंडच्या कलाविभागातर्फे बुरंबी पंचकोशी शिक्षण संस्थेचे शरद बाईत, राजाराम गर्दे तसेच दुभाषी सूरज जाधव सर या सर्वांना धन्यवाद देण्यात आले.

मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेस च्या शुभारंभाचा क्षण

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button