रत्नागिरीत आजपासून ‘आर्ट सर्कल’चा कला महोत्सव
विजय घाटे, ताकाहिरो आराई, पं. वेंकटेश कुमार, अजय जोगळेकर, यशस्वी सरपोतदार या दिग्गज कलावंतांचा समावेश
रत्नागिरी : तब्बल दीड दशकांची परंपरा लाभलेला आर्ट सर्कलचा कला महोत्सव आजपासून (दि. २१ जानेवारी ) येथील थिबा पॅलेस च्या प्रांगणात संपन्न होत आहे. दोन दिवसीय या कला महोत्सवात दिग्गज कलावंतांच्या सादरीकरणात रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
रत्नागिरीच्या सांस्कृतिक तसेच कलाक्षेत्रात मागील दीड दशकांपासून अग्रेसर असलेल्या आर्ट सर्कल मार्फत कला महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी दिनांक 21 व 22 जानेवारी 2023 असा दोन दिवस येथील किंवा पॅलेसच्या प्रांगणात महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विजय घाटे, ताकाहिरो आराई, पंडित वेंकटेश कुमार अजय जोगळेकर यशस्वी सरपोतदार व शीतल कोळवलकर अशा दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत दोन दिवस शास्त्रीय संगीताची मेजवानी या महोत्सवात संगीत रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
रत्नागिरीतील पुरातत्वीय वारसा असलेल्या ब्रह्मी बनावटीच्या तीबा पॅलेस हा कला महोत्सव होत आहे. पद्मा तळवळकर यांच्या गायनाने दिनांक 21 जानेवारी रोजी या महत्त्वाचा शुभारंभ होणार आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता या महोत्सवाचा समारोप किराणा व गोलेर घराण्याचे दिग्गज गायक पंडित वेंकटेश कुमार हे करणार आहेत.
रत्नागिरी वासीय कला रसिकांनी या दोन दिवशीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आर्ट सर्कल कडून करण्यात आले आहे.