महाराष्ट्रलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

शाहीर विकास लांबोरे यांच्या गीताची लांजावासियांना भुरळ

लांजावरील गीताला अवघ्या काही तासात भरभरून प्रतिसाद

लांजा : “माझा लांजा ऐटीत बसलाय ” या गाण्याला लांजा तालुकावासीयांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. प्रसिद्ध शाहीर विकास लांबोरे यांच्या आजच युट्युबवर प्रसिद्ध झालेल्या या गाण्याने लांजावासीयांवर अशी जादू केली की, काही तासातच हे गाणे लोकप्रिय झाले आहे. विवली येथील विकास लांबोरे नोकरीनिमित्त मुबंईला असतात. कवी, लोकशाही म्हणून नावारूपाला आले आहेत. शिवसेना फुटीच्या वेळी ‘कुणी चोरली शिवसेना’ हे त्यांचे गाणे महाराष्ट्रात तुफान गाजले होते. गीतकार, गायक, संगीतकार म्हणून त्यांची वाटचाल कौतुकास्पद आहे.

विकास सखाराम लांबोरे यांच्या ‘रेड क्रिएशन’च्या वतीने लांजा तालुक्यातीलऐतिहासिक वारसा, वास्तू , मंदिरे, बुद्ध विहार, दर्गा, प्रसिद्ध माचाळ, खोरनिनको, एक खांबी जावडे येथील गणपती मंदिर, लांजा कोलधे कोटची माहेरवाशिण झाशीची राणी लक्ष्मीबाई, तलाव, नदी, लांजा शहरातील श्री चव्हाटा मंदिर, केदारलिंग मंदिर, दर्गा, पारंपरिक नमन, जाखडी या कला शेतकरी आणि लांजाचे सौदर्य यांचा समावेश करून लांबोरे यांनी गाणे अप्रतिम रचना केली आहे. पहाडी आवाज, गोड संगीत दिले आहे. मुचुकुंदीच्या पदरात, सहयाद्रीच्या रिंगगणात आणि दर्याच्या अंगणात असे बोल असलेल्या या गाण्याची सुरुवात भारावून जाते. प्रशांत कदम, अरविंद स्टुडिओ, चंदन दरडे, अमित झोरे, ढेरे, सुनील गोरे, राकेश चव्हाण, योगेश लांबोरे, नितीन पवार, विजय मायगडे यांनी साथ दिली आहे.

गीत, संगीत यात हातखंडा आहे. त्यांची बरीचशी गाणि व्हायरल झालीयत. त्यातला आशय लोकांना भावतो म्हणून लोक त्यांच्या गाण्यावर भरभरून प्रेम करतात. आपल्या गावाविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी लांजावर आधारित गाणं तयार केलंय. आज ते प्रसारित झाले आहे.
लांजा हे गाव अप्रतिम आहे. तलावांचा तालुका म्हणून त्याची ओळख आहे. कोकणातील निसर्गसंपदेन नटलेल्या हा तालुका अप्रदूषित आहे. लांजाला आनंदाचं गाव म्हणतात ते याचमुळे. नंदनवन कसं असेल तर लांजासारखं. या लांजा गावाचा महिमा गाण्याचा प्रयत्न विकासबुवा यांनी केलाय, अशी प्रतिक्रिया नितीन कदम यांनी दिली.

  1. हे देखील वाचा : Konkan Railway | दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेनला आणखी दोन थांबे
  2. Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!
  3. Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button