आकाशवाणीच्या ‘बालजगत’मध्ये रत्नागिरीच्या नवनिर्माण हायस्कूल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम

२९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रसारण
रत्नागिरी : आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारा बाल जगत हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. 29 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात नवनिर्माण हायस्कूलच्या मुलांनी सादर केलेला विविधरंगी कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
नवनिर्माण हायस्कूलच्या मुलांनी साहित्याचे विविध प्रकार सांगणारी छोटीशी नाटिका हे कार्यक्रमाच मुख्य वैशिष्ट्य आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये साहित्याचे कितीतरी प्रकार आहेत तेच उलगडून दाखवणारी ही छोटीशी नाटिका या कार्यक्रमात सादर होणार आहे. त्यासोबतच अन्य कार्यक्रमांचाही यात अंतर्भाव आहे.
1143 कि. ह. या मध्यम लहरी वाहिनीवर तसेच 101.5 मे. ह. या एफ. एम. वाहिनीवर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर सकाळी साडेनऊ वाजता बाल जगत या कार्यक्रमात ऐकता येणार. मुलांना शाळेच्या संस्थापिका सीमा हेगशेट्ये यांच मार्गदर्शन लाभलं आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन सोनाली सावंत यांनी केलं असून सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.





