रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलचे कला उत्सवात यश

- अश्मी होडे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; वरद मेस्त्री विभागात दुसरा
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयोजित केलेल्या कला उत्सवाच्या जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धेत फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. विविध आठ कला प्रकारांमध्ये जिल्हास्तरावर उल्लेखनीय कार्य केले. विभागीय स्पर्धेत अश्मी होडे प्रथम तर वरद मेस्त्री यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा शोध घेण्यासाठी कला उत्सवाचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने केले होते. ३ सप्टेंबरला पटवर्धन हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय कला उत्सव झाला. समूह गायन स्पर्धेत
शमिका शेवडे, वेदा प्रभुघाटे, वेदश्री सातवळेकर, अद्वैत आगरे, शर्विल ठीक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. समूह वादन स्पर्धेत मैत्रेयी देसाई, सार्थक पंडित, साहिल देवरुखकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. एकल स्वरवादन प्रकारात वेदांत पांचाळ, तसेच तालवाद्य प्रकारात घनश्याम जोशी यांनी तृतीय पटकावला. द्विमितीय एकल दृश्यकला प्रकारात वरद मेस्त्री याने जिल्ह्यात प्रथम प्रथम तर विभागात द्वितीय क्रमांक पटकावला.
त्रिमितीय दृश्यकला प्रकारात अश्मी होडे हिने जिल्हास्तर आणि विभागात प्रथम क्रमांक पटकावला. तिची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. दृश्यकला समूह प्रकारात पर्णिका परांजपे आणि काव्या भुर्के यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
पारंपरिक कथाकथन स्पर्धेत पूर्वा जोशी आणि मंजिरी सावंत यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षक नेहा शेट्ये, संस्था सचिव दिलीप भातडे व संस्थेचे पदाधिकारी यांनी लयशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.