ओबीसी आरक्षण रक्षणासाठीचे उपोषण मंगेश ससाणे यांनी सोडले

उद्योग मंत्री उदय सामंत, ना. छगन भुजबळ यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
पुणे : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी पुणे येथे उपोषणासाठी बसलेले मंगेश ससाणे यांची यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी केल्यानंतर ससाणे यांनी आपले उपोषण सोडले आहे.

महायुती सरकार ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून भविष्यातही सरकारचे हेच धोरण कायम असेल, असे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामान तसेच ना. छगन भुजबळ यांनी उपोषणकर्त्या मंगेश ससाणे यांना दिले. त्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
या प्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री श्री. गिरीष महाजन, कृषीमंत्री श्री. धनंजय मुंडे, आ. श्री. गोपीचंद पडळकर, श्री. प्रकाश शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.