महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक ,०७ ऑक्टोबर २०२५ रोजी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली.
महर्षी वाल्मिकी यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते. मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.