तांबेडी गावात सिद्धेश ब्रीद यांनी स्वखर्चातून केला रस्ता!
देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावातील तांबेडी-मधली वाडी- सांगलेवाडी- ईचलेवाडी हा सुमारे ५०० मीटरचा जोड रस्ता गावातील युवा उद्योजक व समाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांनी स्वखर्चातून व गावकऱ्यांच्या सहकार्याने मातीकाम, खडीकरणं, डांबरीकरण आदी कामे करून बनवून दिला आहे.
यापुर्वीही गावच्या देवळात जाणारा रस्ता त्यांनी करून दिला होता. तसाच हा रस्ता स्वखर्चाने करून देणेचे मान्य करून या रस्त्याचे कामाला सुरूवात करून ते काम पुर्णत्वास नेले आहे. या तांबेडी गावातील स्वखर्चातुन केलेल्या ५००मिटर रस्ता मार्गी लागलेने गावातील लोक सिद्धेश ब्रीद यांना धन्यवाद देत आहेत.
गावच्या देवळात जाणारा रस्ता त्यांनी विक्रोळीचे आम. सुनिल राऊत यांच्या सहकार्याने करून दिला होता. तसाच हा रस्ताही ब्रीद यांनी स्वखर्चातून करत गावातील तीन वाड्यांची गैरसोय दुर करत सामाजिक बांधिलकी व गावातील जनतेच्या भावना जपत या रस्त्याचे काम मार्गी लावलल्याने गावकरी समाधान व्यक्त करत आहेत.