लोकल न्यूज

देवरुख मराठी शाळेजवळील छोट्या पूल खचला

वाहतुकीला धोका ; तातडीने दुरुस्तीची मागणी

देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख शहरातील मराठी शाळा नं. १ जवळच नदीवरील वरच्या आळीकडे जाण्या येण्यासाठी मुख्य रहदारी असलेला जुना छोटा पूल एका बाजून खचला आहे. यामुळे या पुलावरून रहदारी करणे धोकादायक झाले असल्याने तो तातडीने दुरूस्त करणण्यात यावी, अशी मागणी त्यावार्डातील नगरसेवक वैभव पवार यांनी न. प. च्या मासिक सभेत केली.

देवरूख वरची आळी. भायजेवाडी. कुंभारवाडी. मोरेवाडी. शिंदेवाडी. गेलेवाडी वाडेश्वर स्मशानभूमी व हरपुडे या कडे जाणे येणे साठी पुर्वी शिवकालीन दगडी पुल होता. त्या दगडी पुलावरून वाहन रहदारी करणे अवघड होत असलेने त्या पुलाच्या लागूनच १९७६ चे सुमारास छोटेखानी पुल बांधणे आला. त्यामुळे वाहनांची व रहदारीचा समस्या दुर झाली.


वार्ड ४ मधील मराठी नं१शाळेच्या जवळच असलेला हा छोटा पुल १९७६ सुमारास बांधणे आला होता. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी वर्गाची व वाहनांची वाहतूक व्यवस्था सक्षम झाली होती.. असा हा मुख्य रहदारी वर्दळ असलेला पूलाचा एक भाग खचत असून त्या मोठे भगदाड पडले असून पाणी साठा असलेने ते भगदाड मोठे होत आहे.. त्यामुळे तो तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.. या दुरूस्तीसाठी अंदाजे १५ लाख रू. खर्च अपेक्षित आहे. त्यादुरूस्ती साठी महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्थान जिल्हा विकास निधीतून वा अन्य निधीतून तातडीने दुरूस्ती करून शाळकरी मुले व जनतेच्या रहदारीला होणारा संभाव्य धोका टाळणेसाठी नगर पंचायतीने तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी नगर सेवक पवार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे दिली. तसेच या विषय मासिक सभेत उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.


हा धोकादायक पूल तातडीने दुरूस्त न केल्यास तो एकाबाजून पडलेस वाहतूक व्यवस्थापुर्णपणे कोलमडून शाळकरी मुले व वाहन धारकांसह जनतेची फार मोठी समस्या निर्माण होणार आहे.
शहरातील गटार व्यवस्थेला प्राधान्य देण्यारे नगर पंचायत प्रशासन त्वरीत काय उपाय योजना करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे..

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button