फुणगूस येथील प्रसिद्ध हजरत शेख जाहीर शेख पिर ऊर्स ५ मार्चपासून
संगमेश्वर : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील फूनगुस येथील हजरत शेख जाहीर शेख पिर बाबा या दर्ग्याचा वार्षिक उर्स महोत्सव दि. ५ ते ८ मार्च दरम्यान साजरा होणार असून या ४ दिवसीय उर्स महोत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तर नियाज(कंदोरी) ने सांगता होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीकिनारी निसर्गाच्या सानिध्यात सर्वांग सुंदर व देखणा असा हजरत शेख जाहीर शेख पिर हा दर्गा उभा आहे. येथील काचेची कलाकृती व सजावट नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. वर्षाकाठी हजारो भाविक येथे भेट देतात.तसेच पर्यटकांना देखील हा दर्गा आकर्षित करू लागला आहे. येथील वार्षिक उर्स उत्सव तर भाविकांना नेहमीच एक पर्वणी ठरली आहे.त्यामुळे उत्सव काळात हाजरो भाविक येथे येतात. त्यामुळे तीन दिवस परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
कोरोनामुळे गेले दोन वर्षे येथील उर्स अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. मात्र यावेळी धुमधडाक्यात व जल्लोषपूर्ण वातावरणात येथील उर्स उत्सव साजरा करण्याचा निर्णय दर्गा व्यवस्थापक व ग्रामस्थांनी घेतला असून त्याची तयारी देखील करण्यात आली आहे. संपूर्ण परिसराची साफसफाई रंगरंगोटी व सजावट करण्यात येत आहे.
रविवार दि.५ मार्च रोजी चुना मुबारक ने उर्स ची सुरुवात होणार असून सोमवार दि.६ मार्च रोजी दुपारी दर्गा व्यवस्थापक नूरमहंमद मुजावर सह व्यवस्थापक मुसववीर मुजावर यांच्या निवास्थानातून नाशिक ढोल ताशांच्या गजरात संदल मुबारक ची मिरवणूक निघणार आहे.फूनगुस मोहल्ला,बाजारपेठ या मार्गाने मिरवणूक
सायंकाळी दर्गेत येईल आणि मिरवणुकीचा समारोप होईल.तसेच रात्री १० वाजता दर्गा परिसरात नुराणी मैफिल फूनगुस यांचा रातीब(मस्तान)चा कार्यक्रम होणार आहे. पिरोमुरशीद अस शेख नासीर हसन मुजावर काद्री यांचे सुपुत्र मुसववीर मुजावर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दि.७ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने उर्स उत्सव साजरा होणार आहे.रात्री संदल मुबारक ची मिरवणूक निघेल.फूनगुस मोहल्ला तसेच बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक रात्री दर्गेत दाखल होईल आणि मजार शरीफवर गिलाफ व संदल सादर केला जाईल.बुधवारी दुपारी नियाज (कंदोरी)चा कार्यक्रम होऊन या महोत्सवाची सांगता होणार आहे.
या उर्स उत्सवासाठी व्यवस्थापक नूरमहंमद मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली मुसववीर मुजावर,मुजम्मील मुजावर,कादर खान,अश्रफ खान (जाडे) हसन खान,मूनवर खान,मुनिर खान,इकबाल पटेल, जमीर नाईक,हानिफ खान,अरमान खान,अतिक खान, मोहसीन खान,इम्रान खान, यांच्यासह सर्व तरुण मेहनत घेऊन तयारी करत आहेत. उर्स उत्सव काळात भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नूरमहमद मुजावर यांनी केले आहे.