भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळ पोंक्षे यांचे निधन
देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावचे रहिवासी व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री शशिकांत उर्फ बाळ पोंक्षे यांचे आकस्मिक निधन झाले ते ७२ वर्षांचे होते.
शिक्षक व पत्रकार गौरव पोंक्षे यांचे ते वडील होत. शशिकांत पोंक्षे हे २००७ ते २०१७ या कालावधी ते आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम केले. दहा वर्षे ते सलग पोलीस खात्यांतर्गत असलेल्या ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष होते.शेती व दुग्धोत्पादनाच्या माध्यमातून अनेकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या आमदारकीच्या काळात माखजन परिसरात पक्षवाढीच्या दृष्टीने त्यांनी मोलाचे कार्य केले.सध्या ते आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण मंदिराचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. गावातील सर्व स्तरातील,सर्व पक्षीय लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी धाव घेतली.अंत्ययात्रेला परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा ,मुलगी नातवंडे, जावई सून असा परिवार आहे.