लोकल न्यूज
माभळे येथे २३ जानेवारीपासून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
माघी गणेशोत्सवानिमित माभळे काष्टेवाडीत २३ ते २५ दरम्यान विविध कार्यक्रम
संगमेश्वर : नवतरुण मित्र मंडळ माभळे काष्टेवाडीत गणेश जयंती निमित्त 23 ते 25 जानेवारीला विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवा निमित्त 23 जानेवारी ला सायं . ७ वा . जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे
दि. २४ जानेवारी रोजी कबड्डी स्पर्धा 25 जानेवारीला सकाळी ९ वा . श्रींचा अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १२ ते २ महाप्रसाद सायं. ३ वा . हळदीकुंकू समारंभ सायं . ५ बा . भजनाचा कार्यक्रम सायं . ६ वा . उपांत्य फेरीतील सामने व अंतिम सामना रात्री ८ वा . बक्षिस वितरण , गुणगौरव व सत्कार समारंभ 10 वा . स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.