लोकल न्यूज
रत्नागिरीतील ‘इस्कॉन’च्या मंदिरात उद्या पंचतत्व अभिषेकासह ५६ भोग
रत्नागिरी : येथील एमआयडीसी क्षेत्रातील लायन्स आय हॉस्पिटलनजीक श्री श्री निताई सुंदर नवद्वीप चंद्र मंदिरात रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी श्री पंचतत्त्व अभिषेक आणि ५६ भोग आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी ‘इस्कॉन’च्या मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे :
6:30pm -6.45 pm – गौर आरती, 6.45pm -7.30pm – अभिषेक, 7:30pm -8:30pm- पंचतत्व लीला प्रवचन – श्री रसराज गोपाळ प्रभु, 8:30pm -9.00pm – आरती, किर्तन, 56 भोग, 9:00pm -9:30pm – सर्वासाठी महाप्रसाद.
श्री श्री निताई सुंदर नवद्वीप चंद्र आणि पंचतत्व यांच्या प्रसन्नतेसाठी सर्व भक्तांनी यथाशक्ति भोग आणावे, असे आवाहन गृहस्थ भक्ती प्रचार समितीमार्फत करण्यात आले आहे.