सद्गुरु मंदिर सह्याद्री नगरच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
देवरूख (सुरेश सप्रे) : गौरी विहार संकुलाचे निर्मित व गौरी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य चिटणीस व उद्योजक बारक्याशेट बने यांनी उभारलेल्या देवरूख-साडवली सह्याद्री नगरातील श्री सद्गुरू मंदीराचा १९ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न होत आहे.
या वर्धापन दिना निमित्त गौरी विहार संकुलात उभारलेले भव्य संगित कारंजे हे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.. या सोहळ्याचे माजी आम. सुभाष बने यांचे हस्ते उद्घाटन करून सुरूवात झाली असून११ जानेवारी २०२३ला समाप्ती होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही या १९व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दि. ८ रोजी रात्रौ० वा. नाट्य पुरस्कार विजेते गलती से मिस्टीग या नाटकाचे सादरीकरण करणेत येणार आहे. दि ९ रोजी रात्रौ ८वा.अरूण घाडी ( कुडाळ) व विनोद चव्हाण (मुंबई) यांचे भजनाची डबलबारी सामना रंगणार आहे. दि १० रोजी प्रती वर्षांप्रमाणे दत्तमंदिर-बाजारपेठ ते स्वामी समर्थ मंदिर गौरी विहार पर्यंत सद्गुरूरांचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे. दि ११ रोजी पहाटे ५.३० वाजता काकडा आरती. ९वा.दत्त याद ११ वा. सत्यनारायण महापुजा. ६वा. गजानन प्रासादिक भजन मंडळ काटवली याचे सुस्वर भजन. तर रात्रौ १० वा. उज्ज्वला व्हटकरमंबई निर्मित वारसा महाराष्ट्राचा हा सदाबहार आर्केट्रा सादर होणार आहे.
या सर्व वर्धापनदिन सोहळ्याला आपलाच आहे समजून दर्शन व रोजच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गौरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश तथा बारक्याशेट बने यांनी केले आहे..