होळीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर
दहावी-बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रत्नागिरी : जिल्हयात 06 मार्च, 2023 रोजी होळीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु सोमवार 06 मार्च, 2023 रोजी इयत्ता 10 वी चा इंग्रजी या विषयाचा व इयत्ता 12 वीचा सहकार या विषयाचा पेपर असल्याने परिक्षांशी संबंधीत पुढील यंत्रणांनी दि. 06 मार्च, 2023 रोजी कर्तव्यावर उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी आदेशित केले आहे.
1. शिक्षण विभाग (माध्यमिक) व सर्व अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी, 2. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व), 3.सर्व नियुक्त इयत्ता 10 वी व 12 वी परिरक्षक व सहाय्यक परिरक्षक तसेच त्यांनी नियुक्त केलेला कर्मचारी वर्ग (उच्च माध्यमिक/ माध्यमिक/प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी), 4. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांनी नियुक्ती केलेली सर्व भरारी पथके व त्यातील सदस्य, 5. कोकण बोर्ड रत्नागिरी कडून नियुक्त केलेली सर्व भरारी पथके व त्यातील सदस्य, 6. परिक्षेशी संबंधीत पोलीस यंत्रणा / आरोग्य केंद्र, 7.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले वीज वितरण कर्मचारी., 8.जिल्हास्तरीय दक्षता समिती व तहसिल कार्यालयातून परिक्षेसाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी या यंत्रणांनी दि.06 मार्च 2023 रोजी उपस्थित राहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले आहे.