अंतिम आकडेवारीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ६२.५२ टक्के मतदान
- निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती
रत्नागिरी, दि. ८: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 62.52 टक्के मतदान झाले आहे. 4 लाख 59 हजार 99 इतक्या पुरुष तर 4 लाख 48 हजार 518 इतक्या महिला अशा एकूण 9 लाख 7 हजार 618 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदारंनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. 265 चिपळूण – 76 हजार 721 पुरुष, 78 हजार 306 महिला असे एकूण 1 लाख 55 हजार 27, 57.46 टक्के, 266 रत्नागिरी – 85 हजार 564 पुरुष, 86 हजार 574 महिला, इतर 1 असे एकूण 1 लाख 72 हजार 139, 60.71 टक्के, 267 राजापूर – 67 हजार 460 पुरुष, 73 हजार 573 महिला असे एकूण 1 लाख 41 हजार 33, 60.34 टक्के, 268 कणकवली – 77 हजार 47 पुरुष, 73 हजार 273 महिला असे एकूण 1 लाख 50 हजार 320, 66.01 टक्के,
269 कुडाळ – 73 हजार 349 पुरुष, 66 हजार 507 महिला असे एकूण 1 लाख 39 हजार 856, 65.86 टक्के, 270 सावंतवाडी – 78 हजार 958 पुरुष, 70 हजार 285 महिला असे एकूण 1 लाख 49 हजार 243, 66.49 टक्के,.
लोकसभा मतदार संघातील एकूण 14 लाख 51 हजार 630 मतदारांपैकी 9 लाख 7 हजार 618 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ही एकूण टक्केवारी 62.52 आहे.
लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 2 बीयु, 2 सीयु आणि 17 व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. यात 265 चिपळूण –1 बीयु, 1 सीयु, व्हीव्हीपॅट 4, 266 रत्नागिरी –1 व्हीव्हीपॅट , 267 राजापूर – बीयु 1, सीयु 1, व्हीव्हीपॅट 2, 268 कणकवली –व्हीव्हीपॅट 5, 269 कुडाळ –व्हीव्हीपॅट 3, 270 सावंतवाडी –व्हीव्हीपॅट 2,