आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी निवृत्त पोलीस उपायुक्त सुनील कलगुटकर यांची निवड
रत्नागिरी : आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतून पोलीस उपायुक्त पदावरून निवृत्त झालेले श्री. सुनील कलगुटकर यांची निवड करण्यात आली आहे. श्री. कलगुटकर त्यापूर्वी रत्नागिरी शहर पोलीस स्थानक, लांजा तालुका, गुहागर तालुका, दापोली तालुका येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहताना त्यांची अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती होती.
रत्नागिरी जिल्ह्याची खडान्खडा माहिती व प्रचंड जनसंपर्क असलेले श्री. कलगुटकर जिल्ह्यातील पक्षाच्या वाढीसाठी भरीव योगदान देतील असा विश्वास पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री परेश साळवी यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पक्षाचे जिल्हा संघटक हबीब सोलकर, जिल्हा सचिव हबीब बावानी, राजापूर तालुकाध्यक्ष सचिन आपिष्टे, डॉ. रवींद्र जाधव रत्नागिरी तालुकाध्यक्ष ज्योतिप्रभा पाटील, जिया मुल्ला, रत्नागिरी शहरप्रमुख नाझीम मझगावकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
आम आदमी पक्ष जिल्हाध्यक्ष श्री. परेश साळवी यांनी श्री. कलगुटकर यांना पक्षातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.