ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

कोकण रेल्वे मार्गावर २७ फेब्रुवारीला अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी अडीच तासांचा  ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
 या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 27 रोजी  दुपारी 12 वाजून 40 मिनिटांपासून सायंकाळी 3  वा. 10 मिनिटांपर्यंत असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

या ब्लॉकमुळे कोईमतून ते जबलपूर दरम्यान धावणारी व 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रवास सुरु होणारी विशेष गाडी 02197 ही रत्नागिरी ते कामथे स्थानकादरम्यान 1 तास थांबवून ठेवली जाणार आहे. याचबरोबर सावंतवाडी ते  दिवा दरम्यान धावणारी 27 फेब्रुवारी 2024 रोजीची गाडी  (10106) 1  तास 10 मिनिटे सावंतवाडी ते रत्नागिरी दरम्यान रोखून ठेवली जाणार आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button