ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

कोकण रेल्वे मार्गावर २९ ऑगस्टला तीन तासांचा मेगाब्लॉक

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉकमुळे या कालावधीत या भागातून पास होणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामध्ये तिरुनेलवेली ते जामनगर एक्सप्रेस (19577) जिचा प्रवास 28 ऑगस्ट 2023 रोजी सुरू होतो ती गाडी कर्नाटकातील ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान अडीच तास थांबवून ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी (16346) ही अप नेत्रावती एक्सप्रेस जिचा प्रवास 28 ऑगस्ट रोजी सुरू होतो ती ठोकूर ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान सुमारे एक तास रोखून ठेवली जाणार आहे

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button