कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी दोन गाड्यांना एलएचबी डबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांचे पूर्वीचे जुने रेक बदलून त्या ऐवजी आधुनिक श्रेणीतील एलएचबी रेक पुरवण्यात आले आहेत. या मार्गावरून धावणाऱ्या आता काही थोड्याच गाड्या या पारंपरिक रेकसह धावत आहेत. जामनगर- तिरुनेलवेली तसेच हापा -मडगाव मार्गावर धावणाऱ्या गाड्या देखील आता नव्या एलएचडी रेकसह धावणार आहेत.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जामनगर तिरुनेलवेली (19578 / 19577) ही कोकण रेल्वे मार्गे आठवड्यातून दोनदा धावणारी एक्सप्रेस आता एल एच बी डब्यांसह धावणार आहे. जामनगर-तेरूनेलवेली एक्सप्रेस जामनगर येथून दि. 26 ऑगस्ट 2023 च्या फेरीपासून तर तिरुनेलवेली ते जामनगर या मार्गावर धावताना 29 ऑगस्ट च्या फेरीपासून एलएचबी रेकसह धावणार आहे.
हापा -मडगाव दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीचे (22908 / 22907) जुने आयआर एस बनावटीचे डबे बदलून आता एलएचबी करण्यात आले आहेत. ही गाडी दि. 30 ऑगस्ट रोजी हापा येथून सुटताना एल एच बी रेक्सह धावणार आहेत तर मडगाव येथून हापासाठी धावताना ती दि. 1 सप्टेंबर 2023 च्या फेरीपासून एलएचबी श्रेणीच्या डब्यांसह धावणार आहे.
जुन्या डब्यांच्या रचनेत या दोन्ही गाड्या 23 डब्यांच्या होत्या. मात्र आधुनिक एलएचबी श्रेणीच्या रेकमुळे त्या 22 डब्यांच्या धावणार आहेत.