कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी श्रीकांत चाळके यांची निवड
नवी मुंबई, दि. 25 : कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत चाळके यांची निवड झाली आहे. विभागीय माहिती कार्यालय कोंकण भवन या ठिकाणी आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीस समितीचे सदस्य मनोज जालनावाला,प्रणव पोळेकर, दिलीप देवळेकर, हर्षद पाटील उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम २००७ नुसार कोंकण विभागीय स्तरावर ही समिती गठित करण्यात आली आहे.
श्री. चाळके हे मु.पो.सुकीवली, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील रहिवासी असून ते साप्ताहिक सागर एक्सप्रेस, रत्नागिरी या वृत्तपत्राचे संपादक आहेत.
प्रारंभी उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश व. मुळे यांनी उपस्थित समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व श्री. चाळके यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ.मुळे आणि उपस्थित समिती सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.