Adsense
रत्नागिरी अपडेट्स

टीआरपी येथे नवलाई रिक्षा स्टॉपचे उद्घाटन

रत्नागिरी : शहरानजीकच्या टीआरपी येथे नवलाई रिक्षा स्टॉप (टी.आर.पी.)चे उद्घाटन करण्यात आले. नाचणे ग्रामपंचायतीचे सरपंच ऋषिकेश (भैया) भोंगले व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश रसाळ, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


उद्घाटन कार्यक्रमाला उद्योजक दीपक माईण, उद्योजक मनोज सावंत, नवलाई रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष अभिजित सागवेकर, उपाध्यक्ष सुमित नागवेकर, खजिनदार अवधूत आमकर, आरटीओ सदस्य मिथून शिवगण, शेअर रिक्षा संघटना अध्यक्ष अमर पाटील, सचिव इमरान नेवरेकर, रिक्षा संघटना व चालक मालक सदस्य किरण धामापुरकर, शाम देवरुखकर, तेजस पावसकर, आनंद डाकवे, गौरव खेडेकर, दिनेश राहटे, अनंत रहाटे, प्रशांत चव्हाण, भूषण चाळके, सतीश शिंदे, संजय गराटे, विनोद हटकर, अजय पांचाल, वसीम खान, राकेश साळवी, तुकाराम सासुलकर, स्वरूप राऊत, लक्ष्मीकांत महाले, बाबू कदम, रोहित कांबळे व सर्व रिक्षाचालक मालक उपस्थित होते.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button