दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धन काळाची गरज
चिपळूण : दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धन काळाची गरज असल्याचे कृषीदूत अतुल नीळे यांनी सांगितले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्षिकावेळी कुटरे येथे ते बोलत होते. यावेळी कृषिदूतांनी दुधापासून खवा व पेढा बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
भारत एक कृषिप्रधान देश आहे.भारतात जगात सर्वाधिक दुभती जनावरे आहेत. केवळ दूध विक्री करून शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन होत नाही, तर याच दुधावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन करून त्याचे पदार्थ विक्री केले तर आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. मूल्यवर्धित उत्पादनांचा भारताच्या एकूण डेअरी बाजारपेठेतील 35 टक्के वाटा आहे आणि कमोडिटी उत्पादनांचा बाजारातील वाटा जवळपास 65% आहे. मूल्यवर्धन कार्य हे महिला सक्षमीकरणाचे एक साधन आहे. शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामाजिक-आर्थिक तसेच निर्णय घेण्याचे घटक तसेच उद्योजकीय क्षमता वाढविण्यासाठी दुधाच्या मूल्यवर्धनाचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे ,असे कृषिदूत अतुल निळे यांनी पटवून दिले केले.
यावेळी कृषिदूतांनी दुधापासून खवा व पेढा बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. या प्रसंगी वृषाली राजेशिर्के, सुवर्णा मोलक, सुप्रिया मोलक, संध्या राजेशिर्के, संगीता राजेशिर्के, प्रशिला राजेशिर्के, मीनाक्षी पाटणकर तसेच कृषिविश्व कृषिदूत संघातील ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, संग्राम पाटील, सुमित सावंत, अनिकेत मस्के, यश मगर, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे, ओंकार फाळके उपस्थित होते.
काय आहेत मूल्यवर्धित पदार्थ
मूल्यवर्धित उत्पादने द्रव पौष्टिक दूध जोडून किंवा वेगळे करून काही बदल करून किंवा वाढ करून तयार केली जातात. मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये चीज, पनीर, तूप, दही आणि प्रोबायोटिक पेये इत्यादींचा समावेश होतो. ही उत्पादने ऍडिटीव्ह, मायक्रोबियल किण्वन किंवा फक्त द्रव दुधात मिसळून बदल आणि संवर्धनाद्वारे तयार केली जातात.