ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
देवरुखमधील भर वस्तीतील विहिरीत बिबट्या पडला
देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूखची ग्रामदेवता सोळजाई माता मंदिराजवळ राहणारे व्यापारी मंगेश शेट्ये यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याने शहरातील भरवस्तीत त्याचा वावर असल्याचे उघड झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मंगेश शेट्ये यांचा पाणी पंप बंद पडल्याने ते पंपहाऊस जवळ पोहचले व विहिरीतील पाईप पहायला विहीरीत डोकावले असता त्यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसले वर त्यांनी शेजारी व स्वयंसेवी संस्था व वन विभागाला यांना माहिती दिली व सर्वांना पाचारण करण्यात आले आहे.
या घटनेचीमाहिती मिळताच देवरू़ख पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना गर्दी व आरडाओरडा न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.