रत्नागिरी अपडेट्स
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून रत्नागिरी-संगमेश्वरमधील विविध विकासकामांचा आढावा
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, क्रिडा विभाग, जलसंधारण विभाग, खारभूमी विभाग, मेरीटाईम बोर्ड, गाळ उपसा, पोलीस विभाग, आरोग्य विभाग आदि विभागामार्फत सुरु असलेल्या व प्रस्तावित विविध कामांचा तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत सुरु कामांचाही आढावा घेतला.