रत्नागिरी अपडेट्स
पाली येथे विनाफटका बैलगाडी स्पर्धा
रत्नागिरी : जय शिवराय मित्रमंडळ, पाली ( रत्नागिरी ) आयोजित भव्य विनाफटका जिल्हास्तरीय बैलगाडी स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी प्रख्यात उद्योजक वडील अण्णा सामंत, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, अजित यशवंतराव, बाबूशेठ म्हाप, ग्रामस्थ व सर्व संबंधित उपस्थित होते.
न्यायालयीन आदेशाचे पालन करत रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातून अनेक बैलगाडी मालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. रत्नागिरी तालुक्यासह बाहेरील तालुक्यातून देखील ही पारंपरिक स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.