प्राथमिक शाळांना गणपतीसाठी १० तर दिवाळीसाठी १३ दिवस सुट्टी

रत्नागिरी : रत्नागिरी राज्य सरकारकडून इयत्ता पहिली आणि दुसरीच्या नव्या शैक्षणिक रचनेविषयी मार्गदर्शक तत्वे आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पत्रक जारी केले आहे. यामध्ये सुट्ट्यांचा आराखडा दिला आहे. यात यावर्षी गणेशोत्सवाची सुट्टी १० दिवसांची आहे. गणपती सुट्टी २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर असे १० दिवस राहणार आहे.
दिवाळी सुट्टी १८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर असे एकूण १३ दिवस राहणार आहे. उन्हाळी सुट्टी २ मे ते १३ जून २०२६ अशी ३७ दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने काढले पत्रक राहणार आहे. किरकोळ सुट्ट्या ३४ दिवस, हिवाळी सुट्टी १३ दिवस, उन्हाळी ३७ दिवस असे ८४ दिवस सुट्टी राहणार आहे. हिवाळी सुट्टीनंतर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी तर उन्हाळी सुट्टीनंतर १५ जून २०२६ रोजी शाळा सुरु होईल असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या पत्रांत नमूद केले आहे.