मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस उत्पन्नातही सुसाट!
दोन दिवसातील प्रवासी प्रतिसाद शंभर टक्क्यांपेक्षा अधिक
रत्नागिरी : मुंबई गोवा या कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह मध्य रेल्वे कडून चालवल्या जाणाऱ्या चारही वंदे भारत एक्सप्रेस वेगासह उत्पन्न मिळवण्यातही सुसाट चाललेले आहेत. कोकण मार्गावरील आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 16 डब्यांची करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई मडगाव या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला मागील दोन दिवसात लाभलेला प्रवासी प्रतिसाद हा 102.26 टक्के इतका आहे.
मुंबई गोवा अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊन अजून तीन आठवडे देखील झालेले नाहीत. अशी परिस्थिती असताना तसेच सध्या पावसाळी दिवस असताना देखील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा प्रतिसाद हा रेल्वेचा उत्साह वाढवणारा ठरला आहे. मध्य रेल्वे कडून चालवल्या जाणाऱ्या चारही वंदे भारत एक्सप्रेस चा प्रवासी प्रतिसाद उत्तम आहे. खुद्द मध्ये रेल्वेनेच याबाबत माहिती दिली आहे.
मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवासी प्रतिसाद
- १) २२२२३ सीएसएमटी-शिर्डी -९८.६७ टक्के
- २) २२२२४ शिर्डी ते सीएसएमटी -१००.६२ टक्के
- ३)२२२२५ सीएसएमटी ते सोलापूर -१११.४३ टक्के
- ४)२२२२६ सोलापूर ते सीएसएमटी – ११२.४१ टक्के
- ५) २०८२६ नागपूर विलासपूर -१०७.७३ टक्के
- ६) २०८२५ बिलासपूर नागपूर -१२१.५०टक्के
- ७) २२२२९ सीएसएमटी मडगाव-१०२.२६ टक्के
- ८) २२२३० मडगाव ते सीएसएमटी -९२.०७ टक्के