रत्नागिरी अपडेट्स

रत्नागिरीत चाचा नेहरु बाल महोत्सवाचा समारोप


रत्नागिरी : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हयात कार्यरत असणाऱ्या निरीक्षणगृह बालगृह मुलांमुलीसाठी १८ जानेवारी २०२३ ते २० जानेवारी २०२३ पर्यंत आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रत्नागिरी येथे समारोप झाला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी स्पर्धेतील विजेतांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी  विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव, ए.एन. कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, अध्यक्ष बाल कल्याण समिती संदेश शहाणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.बी. काटकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी ए.डी. भोसले , बाल कल्याण समिती सदस्य शिरीष दामले, सदस्या विनया घाग, सदस्या लेवलेकर, सदस्या मलुष्टे  आदि मान्यवर उपस्थित होते.
विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव ए.एन. कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये बालमहोत्वाचो महत्व विषद केले. ते म्हणाल स्पर्धेमध्ये विजेता झाला नाहीत म्हणून निराश होऊ नका, आपण सहभाग घेतला हे फार महत्वाचा आहे. या मुलांना घडविण्याचे चांगले काम या संस्था करतात. त्यामुळे मुलांनी देखील आपण समाजाचे काही तरी देण लागतो याची जाणीव ठेवणे गरजेच आहे असे ते म्हणाले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फुले म्हणाल्या या स्पर्धांमधून मुलांचे शारीरीक व मानसिक बळकटीकरण होते. स्पर्धेमधून आपण कुठे आहोत ते कळते. त्यांना स्वत:चे आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळते. अशा प्रकारे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कोतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
बाल महोत्सवात क्रिकेट, खोखो, कबडडी, गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४ x १००मीटर रिले, कॅरम, बुध्दीबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, अशा क्रिडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, सामुहिक गायन, नाटीका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन इ. सांस्कृतीक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पधेंमधील विजेते, उपविजेतांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेमधील सर्वसाधारण विजेतेपद कै. जानकीबाई (आक्का) तेंडूलकर बालगृह, लांजा यांना देण्यात आला.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हयात कार्यरत असणाऱ्या निरीक्षणगृह बालगृह संस्थांबरोबरच नगरपालिका शाळेतील मुलांनीही यामध्ये सहभाग नोंदविला.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.बी.काटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button