क्राईम कॉर्नरमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

रत्नागिरीत दोन तरुणांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळले

रत्नागिरी : शहरा नजीकच्या एमआयडीसी क्षेत्रातून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या मार्गावर दोन तरुणांचे मृतदेह  आढळून आले. या दोघांपैकी एकाची ओळख पटली असून मृत तरुण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी आहे.

मिरजोळे एमआयडीसी परिसरातील रेल्वे ब्रिज ते प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यातील एका तरुणाची दत्ता बिरा यमगर (34, राहणार सांगोला जिल्हा सोलापूर ) अशी ओळख पटली आहे तर रेल्वे ब्रिज ते आरटीओ कार्यालय परिसरात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. यातील एका घटनेत तरुणाच्या शरीरावरून रेल्वे गाडी गेल्यामुळे शीर हे धडापासून वेगळे झाले होते. या घटनांमधील तरुणांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

या दोन्ही मृतदेहांची जिल्हा शासकीय रुग्णालय उत्तरीय  तपासणी करण्यात आली

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button