रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताहः विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. २८ : महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्यावेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणाची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा आणि महसुली वसुलीचे उदिद्ष्ट पार करणा-या अधिकारी / कर्मचा-यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दिनांक १ ऑगस्ट, हा दिवस “महसूल दिन” म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.
यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच दिनांक १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या महसूल सप्ताहनिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात येणार आहेत.
1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”, 2 ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, 3 ऑगस्ट रोजी ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”, 4 ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”, 5 ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”, 6 ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा” आणि 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण” व महसूल सप्ताह सांगता समारंभ”