रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे रिक्षा व्यावसायिकांसाठी स्वच्छतागृह उभारावे
- सा. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपच्या वतीने करण्यात आली मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा व्यावसायिक यांनी स्वच्छतागृह आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रविद्र चव्हाण यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. ना. चव्हाण यांनी याबाबत तत्काळ सूचना केल्या आहेत तरी या सूचनांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ व्हावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी केली आहे.
स्वच्छतागृहाची व्यवस्था झाल्यास रिक्षा व्यावसायिक यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, तालुकाध्यक्ष दादा दळी, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप नाचणकर, उमेश देसाई, संकेत कदम, संतोष बोरकर, निलेश आखाडे आदी उपस्थित होते.