ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

दिवा-रत्नागिरी मार्गावर धावणार नवी-कोरी मेमू पॅसेंजर!

रत्नागिरी : पूर्वीची दादर रत्नागिरी आणि सध्याची दिवा रत्नागिरी पॅसेंजर आता लवकरच नव्या रंगरूपात धावताना दिसणार आहे. देखभाल दुरुस्तीसह वेगवर्धन, सेक्शनमध्ये लवकर क्लिअरन्स मिळणे अशाच फिचर्ससह येणारी ही मेमू प्रकारातील गाडी असेल. मात्र, सध्याच्या गाडीच्या तुलनेत नव्या गाडीची आसन क्षमता घटणार असल्याने गाडी नवी कोरी आली तरी ही बाब मात्र कोकणवासीच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरणार आहे

कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून धावत असलेली कोकणवासी यांची लाडकी पूर्वीची दादर- रत्नागिरी पॅसेंजर (50103/50104) कोरोना काळापासून दिवा- रत्नागिरी पॅसेंजर झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच आधीच्या निळ्या पांढऱ्या रंगसंगतीमधील जुन्या गाडीऐवजी लाल रंगातील एलएचबी श्रेणीमधील दीनदयाळू प्रकारच्या कोचसह पॅसेंजर धावत आहे. मात्र, आता ही गाडी आता पुन्हा एकदा नव्या रंगरूपात धावताना दिसणार आहे.

विद्युतीकरण झाल्याने मेमू गाडी चालवली जाणार

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे आता विद्युतीकरण पूर्ण झालेले असल्यामुळे दिवा ते रत्नागिरी मार्गावर सध्या धावत असलेल्या लाल-करड्या रंगसंगतीमधील एल एच बी रेकऐवजी मेमू प्रकारातील गाडी धावताना दिसणार आहे. यासाठी आयसीएफ कपूरथळा येथील कारखान्यात रेक तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. रेल्वे सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिवा ते रत्नागिरी मार्गावर सध्या धावत असलेल्या गाडीला रिप्लेस करण्यासाठी मेमू गाडी मध्य रेल्वेच्या हद्दीत दाखल झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या मेमू गाडीसाठी आवश्यक असलेले सर्व डबे दाखल झाल्यानंतर ही गाडी सध्याच्या गाडी ऐवजी चालवली जाणार आहे.

दुतोंडी मेमू वेळ वाचवणार!

दिवा ते रत्नागिरी या मार्गावर सध्या धावत असलेलली एलएचबी प्रकारातील गाडी ती धावणार असलेल्या दिशेला विद्युत इंजिन जोडून चालवली जात आहे. मात्र मेमू गाडीला दोन्ही बाजूला इंजिन असल्यामुळे सध्या ‘लोको रिवर्सल’साठी लागणारा वेळ वाचणार आहे. याचबरोबर या प्रकारातील रेक पंधरा दिवसातून एकदा तांत्रिक देखभालीसाठी पाठवला तरी चालतो. सध्याच्या गाडीची आठवड्यातून एकदा देखभाल करावी लागत आहे. त्यामुळेच ही बाब रेल्वेच्या दृष्टीने पथ्यावर पडणार आहे.

सध्याच्या तुलनेत आसन क्षमता घटणार


दिवा-रत्नागिरी मार्गावर सध्या एल एच बी दीनदयाळू प्रकारातील गाडी धावत आहे. या गाडीतील आसन रचना गर्दीच्या हंगामात प्रवाशांसाठी लाभदायक ठरत होती. सीटच्या वरही बसण्याची व्यवस्था असल्याने गर्दीच्या वेळी खाली जागा नाही मिळाली तर प्रवासी वर जाऊन बसू शकत होते. मात्र, नव्याने येणाऱ्या मेमूमध्ये अशी व्यवस्था नसेल. वर्षभर गर्दीने भरून जाणाऱ्या या गाडीने प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी ही बाब मात्र, ठरणार आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button