महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

लांजा काँग्रेसला मोठे खिंडार; रिंगणेचे सरपंच संजय आयरेंसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

सौ. उल्का विश्वासराव यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई (सुरेश सप्रे ) : लांजा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचा प्रभावी चेहरा, ग्रामपंचायत रिंगणेचे विद्यमान सरपंच संजय आयरे यांनी आपल्या अनेक सहकारेंसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने लांजा काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

रिंगणेचे सरपंच संजय आयरे हे रत्नागिरी काँग्रेसच्या सहकार विभागाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आज मुंबई येथे कोकणचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आयरे यांनी पक्षप्रवेश केला.

काँग्रेसची गोंधळलेली स्थिती आणि विरोधकांच्या एकजूटीतील मतभेद यांमुळे काँग्रेस पक्ष स्पर्धेत मागे असून काँग्रेसमधील सुजाण, सेवाव्रती आणि मोदीजींच्या कार्यपद्धतीवर विश्वास असणाऱ्या समाजीक कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजाप्रती आपले कर्तव्य करण्याचे आवाहन सौ. विश्वासराव यांनी वेळोवेळी करतात. या आवाहनाला प्रतिसाद देत संजय आयरे व त्यांच्या समर्थकांनी पक्षप्रवेश केला आहे.

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा-साखरपा विधानसभेची सूत्रे सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्याकडे सोपवलीनंतर त्यांनी या विधानसभा मतदारसंघात अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

संजय आयरे हे शैक्षणिक क्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे. याशिवाय विविध स्थानिक सहकारी संस्थांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम करत असताना आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रातील वाटचाल केली असून त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. “आयरेंसारखे कर्तबगार व्यक्तिमत्त्व भाजपामध्ये प्रवेश करत असल्याने लांजा तालुक्यात संघटनेला निश्चित उभारी मिळेल. अभ्यासू, मेहनती व संयमी स्वभावाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहेत.तसेच भाजपाच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेऊन पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वागत करण्यात येईल असे नाम. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले

यावेळी संजय आयरेंसोबत शामराव कांबळे (सदस्य, ग्रा.पं. रिंगणे),रमेश धुळप, रमेश धुळप (सदस्य, ग्रा.पं. रिंगणे), अनिल राजीवले, विलास आयरे,महेश वाडेकर (सरपंच, ग्रा.पं. रिंगणे), सुनील पेडणेकर, ,उत्तम पांचाळ, अनिकेत आयरे आदी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
संजय आयरे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश हा रत्नागिरी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे लांजा तालुका काँग्रेसमध्ये खिंडार पडले आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button