महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

सकल हिंदु समाज रत्नागिरीच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांचा जाहीर सत्कार

  • हिंदु धर्मावर होणार्‍या सर्व आघातांवर ‘हिंदु राष्ट्र’ हा एकमेव उपाय : रमेश शिंदे

रत्नागिरी :  आज जगात जेवढी म्हणून राष्ट्रे आहेत, ती धर्माच्या आधारावर आहेत. केवळ भारत देश ‘सेक्युलर’ आहे. पाकिस्तान, बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर त्यांचा ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हणून उदय झाला, मग भारत ‘हिंदु रिपब्लिक’ का झाला नाही? खरे पाहिले, तर जगातील कुठलेही संविधान हे त्या देशातील बहुसंख्य लोकांसाठी बनते, अल्पसंख्याकांसाठी नाही. भारत जगातील एकमेव देश आहे, जिथे सर्व अधिकार अल्पसंख्यांकांना दिले आहेत, बहुसंख्यांकांसाठी काही नाही. बहुसंख्यांकांना कोणी विचारतही नाही. या परिस्थितीमध्ये बदल झाला पाहिजे. या परिस्थितीचा गैरफायदा उठवत ‘लव्ह जिहाद’, लॅण्ड जिहाद’, ‘हलाल जिहाद’ आदी अनेक जिहादांमधून हिंदूंवर आघात केले जात आहेत. या सर्व आघातांवर एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हाच आहे, असा ठाम विश्वास हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी येथील ‘जयेश मंगल पार्क’ येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच त्यांना राष्ट्र-धर्म यांसाठी कार्य केले, म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ‘सांस्कृतिक योद्धा 2023’ हा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक शतुषार देवळेकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ढाल-तलवारीची प्रतिमा देऊन श्री. शिंदे यांचा सत्कार केला. या वेळी व्यासपिठावर ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे श्री. राकेश नलावडे, ‘जनजागृती संघा’चे श्री. केशव भट, ‘राष्ट्रीय सेवा समिती’चे श्री. संतोष पावरी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मिथिला वाडेकर यांनी केले. ‘संपूर्ण वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या वेळी श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, मी 12 वर्षांनी महाराष्ट्रात आलो. तोपर्यंत त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम, उडिसा, बंगाल, झारखंड याठिकाणी फिरलो. तेथे हिंदु धर्म, हिंदुत्व ही संकल्पनाच लोकांना माहीती नाही. आज अनेक प्रकारचे ‘जिहाद’ सुरु आहेत. यातील एक ‘हलाल जिहाद’. हलाल हे मांसांशी संबंधित आहे. आपण बाजारातून जे खाद्यपदार्थ घेतो. त्यावर ते खाद्यपदार्थ 100 टक्के शाकाहारी आहेत, हे समजण्यासाठी हिरवा शिक्का असतो. असे असतांनाही त्यावर ‘हलाल’चा लोगो का ? हा आपल्याला प्रश्न पडत नाही. केवळ खाद्यपदार्थच नाही, तर ज्यांचा खाण्याशी कसलाही संबंध नाही, अशा अनेक वस्तू आज ‘हलाल’ प्रमाणित झाल्या आहेत. ‘हलाल जिहाद’ हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील एक मोठा आघात आहे. आपण हे समजून घेऊन देशाची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी सतर्कतेने खरेदी करायला हवी.

सकल हिंदु समाज (रत्नागिरी) चे सर्वश्री तुषार देवळेकर, अभय दळी, राकेश नलावडे, दीपक देवल, संतोष पावरी आदी मान्यवरांकडून श्री. रमेश शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी.

आज ‘जमियत-ए-उलेमा’ ही संघटना 2028 पर्यंत सव्वा कोटी मुसलमानांची फौज सिद्ध करण्याचे ध्येय घेऊन कार्यरत आहे. यांना पैसा येतो कुठून? आणि मुळात देशासाठी भारतीय सैन्य असतांना या फौजेची आवश्यकताच काय आहे ? याही पुढे जाऊन ‘इस्लामिक कॉइन’ काढण्यात आले आहेत. ‘हलाल शेअर माकर्ेट’ सुरू आहे. यापुढे ‘हलाल प्रमाणपत्र’ हवे असेल, तर 2 मुसलमान मौलानांना त्या कंपन्यांमध्ये ‘हलाल इन्स्पेक्टर’ या नावाने वेतन देऊन कामाला ठेवावे लागणार आहेत. या सर्व समस्या अशाच संपणार नाहीत. आपल्याकडे लढण्याची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांनी लढा दिला आहे. या आघातांविरोधात आपल्याला सनदशीर मार्गाने लढावे लागेल, असेही ते म्हणाले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button