सांगली-मिरज मार्गे जाणारी गोवा एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे धावणार !
रत्नागिरी : गोव्यातील वास्को येथून सांगली मिरज मार्गे दिल्लीसाठी धावणारी वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन ही गोवा एक्सप्रेस सांगली, मिरज दरम्यानच्या मार्ग दुहेरीकरण्याच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे वळवण्यात आली आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते वास्को द गामा दरम्यान दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी सुटणारी 12780 ही गाडी तिच्या नेहमीच्या मार्गा ऐवजी कोकण रेल्वे मार्गाने वळवली आहे. वळवण्यात आलेल्या मार्गाने ही गाडी पुणे, कल्याण, पनवेल, रोहा, रत्नागिरी, मडगाव मार्गे वास्को-द-गामाला जाईल.
दिनांक 18 जानेवारी रोजी सुटणारी 12 779 ही गाडी गोव्यामधील वास्को-द-गामा येथून सुटल्यानंतर मडगाव रत्नागिरी, रोहा, पनवेल, कल्याण, पुणे जंक्शनपर्यंत वळवण्यात आलेल्या मार्गाने तर पुढे तिच्या नियमित मार्गाने धावेल. हा बदल तात्पुरत्या स्वरूपात आहे.
या गाडीच्या नियमित मार्गावर मध्य रेल्वेच्या हद्दीत सांगली मिरज दरम्यान दुहेरीकरणणाचे काम करण्यात आले आहे. हा दुपदरी मार्ग वापरात आणण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामामुळे वास्को-द-गामा -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही अप आणि डाऊन अशा फक्त दोन फेऱ्यांसाठी वळवण्यात आली आहे.
वळवलेली गाडी ही स्थानके घेणार नाही
सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, रायबाग, घटप्रभा बेळगावी, लोंढा जंक्शन, कॅसलरॉक, कु्लेम आणि सॅनवरडेम ही स्थानके घेणार नाही.