महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
स्वातंत्र्य दिनानिमित्त गणपतीपुळे मंदिरात तिरंगामय आरास
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे येथील मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. मंदिरात करण्यात आलेल्या या सजावटीमधून श्री संस्थान गणपतीपुळे मार्फत भारतीय तिरंग्याला अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.
निसर्गरम्य समुद्रकिनारी वसलेल्या गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाभाऱ्यात श्रींच्या मूर्तीपुढे केलेल्या फुलांच्या सजावटीमधून भारतीय तिरंगा साकारला होता.