हातखंब्यानजीक एस. टी. बसची दोन वाहनांना धडक
रत्नागिरी : रत्नागिरी -नागपूर महामार्गावर हातखांब्यानजीक पानवळ येथे तीन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये एसटी बसने पुढे असणाऱ्या दोन वाहनांना मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी दुपारी गुरुवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
या बाबत अधिक माहितीनुसार रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी रत्नागिरी-कोल्हापूर-गडहिंगलज ही एसटी बस पानवळ स्टॉप जवळ आली असता पुढे असणारी किया कार (MH 08 AX 5655) गाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर एसटीने धडक दिलेली कार पुढील इनोवा (MH 08AG 0281) गाडीवर धडकली. अशी तीन वाहने मागोमाग माग जोरदार धडकल्याने अपघात झाला. या अपघातात एक ही व्यक्ती जखमी झाली नसली तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एसटीने धडक दिलेल्या या किया गाडीचे बरेच मोठे नुकसान झाले आहे.
अपघातांची माहिती मिळताच घटनास्थळी हातखंबा वाहतूक पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. व परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. काही काळ वाहतूक थांबली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला.